वनमंत्र्यांचा उद्या ग्रामपंचायतींशी 'महा ई संवाद'


वेब टीम : मुंबई
हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या दिनांक २३ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी ३ वाजता राज्यातील सर्व ग्रामपंचायतींशी लाईव्ह 'महा ई संवाद' साधणार आहेत.

 राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी श्री. मुनगंटीवार थेट चर्चा करतील. या सर्वांना मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅबद्वारे  www.parthlive.com  या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी होता येईल.

हरित महाराष्ट्राच्या निर्धाराने वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लोकसहभागातून तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला. या वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्यात २०१७ साली  ४ कोटी वृक्षलागवडीच्या बदल्यात ५ कोटी ४३ लाख वृक्ष राज्यात लागले. यात १६ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. या वृक्षलागवडीची लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.  २०१८ साली १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प १५ कोटी ८८ लाख वृक्ष लागून पूर्णत्वाला गेला. या वृक्षलागवडीत राज्यातील ३६ लाख लोक सहभागी झाले आणि वृक्षलागवड हा केवळ शासनाचा उपक्रम न राहाता ती खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाल्याचे दृष्टिपथात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post