गडाख आमदार असते तर तालुक्याचा बिहार झाला असता – आमदार बाळासाहेब मुरकुटे


वेब टीम : नेवासा
नेवासा ते  नारायणवाडी या सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामाचा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

नेवासा तालुक्याच्या विकासासाठी सर्वप्रथम आपण वीज रस्ते पाणी या विकासात्मक कामांना प्राधान्य दिले असल्याने येत्या निवडणुकीत ही नेवासा तालुक्यासाठी भाजपचाच आमदार निवडून देणे ही काळाची गरज  असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी यावेळी बोलतांना केले.

यावेळी नारायणवाडी येथील हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर रमेश काकडे हे होते. हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज गायकवाड, देवीदास साळुंके,भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, नारायणवाडीचे जेष्ठ मार्गदर्शक रामकीसन काकडे, भाऊसाहेब खैरे,कुंडलिक दादा चिंधे,प्रताप चिंधे,नामदेव खंडागळे,जनार्धन जाधव,आबासाहेब चिंधे,प्रकाश मुळे, अशोक टेकणे,संजय काकडे, दत्तात्रय वरुडे,शैलेश पाटील संभाजी जगताप, सरपंच राजेंद्र वाबळे,विठ्ठल डोईफोडे, रमेश रोडे,संदीप आदमने,प्रदीप रोडे,,मेजर बाळासाहेब राशीनकर,मेजर रविंद्र राशीनकर,ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांचे युवा कार्यकर्ते संजय काकडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.अनेक वर्षांपासून या नारायणवाडी रस्त्याची दैयनिय अवस्था संपणार आहे याकामी अनेकांनी पोकळ आश्वासने  दिली मात्र आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाच कोटी पाच रुपये खर्चाच्या रस्त्याला मंजुरी देऊन नारायणवाडी ग्रामस्थांच्या या रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे याबद्दल त्यांनी आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.

यावेळी बोलतांना आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की, या नारायणवाडी नेवासा या सात किलोमीटर अंतरावरील रस्त्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये मंजूर झाले असून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ,नारायणवाडी गावापासून ईतर गावांना रस्ते जोडण्यात येतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला. लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले सर्व जातीधर्माच्या माणसांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले, असे गौरवोदगार त्यांनी काढले.

विकासात्मक कामे व्हावी म्हणून भाजप व मित्रपक्षाचे सरकार सत्तेवर आले. म्हणून विकासात्मक कामे मला करता आली. तालुक्याच्या जनतेने  देखील बदल घडविला विरोधी आमदार निवडून दिला असता तर बिहारच्या वाटेवर हा तालुका गेला. असता गुंडगिरी व  दादागिरी वाढली असती. आज तालुक्याची विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून आतापर्यंत बाराशे कोटी रुपयांचा निधी आणला. असे सांगून त्यांनी माजी आमदाराने पाच वर्षात आणलेल्या निधीचे स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन त्यांनी गडाखांचे नाव न घेता केले. त्यांनी पाच वर्षात काय दिवे लावले याचे आत्मपरीक्षण करावे. तालुक्यातील नुकसान टाळण्यासाठी जनता त्यांना कधीही स्वीकारणार नाही, असे ही स्पष्ट करून आमदार मुरकुटे यांनी गावाच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी बोलतांना दिली. गणेश राजळे यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post