नगर अर्बन बँकेवर प्रशासकाची नियुक्ती


वेब टीम : अहमदनगर
येथील नगर अर्बन मल्टिस्टेट शेड्युल बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरबीआयचे निवृत्त अधिकारी सुभाषचंद्र मिश्रा यांनी प्रशासक म्हणून सूत्रे ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बँकेचे चेअरमन असलेल्या माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून, या कारवाईमुळे नगर जिल्ह्यासह राजकीय व बँकींग वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कर्जाची थकबाकी वाढल्याने व एनपीएचे प्रमाण वाढल्याने प्रशासक नियुक्ती झाली आहे. याचा बँकेच्या दैनंदीन कामकाजावर परिणाम होणार नसल्याचे चेअरमन दिलीप गांधी यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post