या नवोदित अभिनेत्रीची आत्महत्या


वेब टीम : मुंबई
मुंबईत प्रत्येकजण काहींना काही स्वप्ने घेऊन येतात आणि ती पूर्ण करण्यासाठी अखंड जातात असतात.

या गर्दीत काही जण अपेक्षाभंगाचे दुःख पचवू ना शकल्याने आत्महत्येसारखे भयानक पाऊल उचलतात. बॉलिवूडमध्ये संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका नवोदित अभिनेत्रीने आत्महत्या केली.

ही घटना अंधेरीतील ओशिवारा येथे घडली.तिने गुरुवारी रात्री इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. पर्ल पंजाबी अशी तिची ओळख पटली आहे.

चित्रपटांमध्ये संधी मिळावी यासाठी बरेच दिवस ती प्रयत्न करत होती. मात्र तिला संधी न मिळाल्याने हे पाऊल उचलले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

इमारतीचा सुरक्षा रक्षक बिपीन कुमार याने दिलेल्या माहितीनुसार,“ही घटना रात्री १२.१५ ते १२.३० दरम्यान घडली. काहीतरी आवाज सुरु होता.

मला वाटले कोणीतरी रस्त्यावर आरडाओरड करत आहे. काय झालं आहे हे मी पाहण्यासाठी गेलो होतो. परत आलो तेव्हा पंजाबी राहत असलेल्या तिसऱ्या माळ्यावरुन आवाज ऐकू येत होता”.

“पर्ल पंजाबी मानसिक तणावात होती. आई बरोबर तिचे वारंवार भांडण होत असेल. याआधी दोन वेळा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता”, अशी माहिती पोलिसांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post