देशात लोकशाही आहे यावर मोदी-शहांना विश्वास आहे का? : प्रियांका गरजल्या


वेब टीम : दिल्ली
‘कशाच्या आधारावर काँग्रेस नेत्यांना अटक केली जाते ? माध्यमांशी बोलणे हा गुन्हा आहे का ? देशात लोकशाही आहे यावर मोदी-शहा सरकारला विश्वास आहे का ?’ असा सवाल काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.

गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या अटकसत्रानंतर त्यांनी रोष व्यक्त केला.

राज्यघटनेचे पालन आणि आदर करणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री १५ दिवसांपासून कैदेत आहेत. त्यांना कुटुंबीयांशीही बोलू देत नाहीत.

या देशात लोकशाही आहे यावर सरकारचा विश्वास आहे का ?’ अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

काश्मीरमध्ये सुरु असलेले बेकायदा अटकसत्र थांबवा अशी मागणीही त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post