मंदी असतांना सरकारने बाळगलेले मौन धोकादायक : प्रियांका गांधी


वेब टीम : दिल्ली
देशातल्या आर्थिक मंदीवरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे.

‘मंदीच्या परिस्थितीवर सरकारने बाळगलेले मौन धोकदायक आहे’ अशी टीका त्यांनी केली.

माध्यमांमध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या आणि नोकरीत झालेल्या कपातींच्या वृत्तांचे दाखले देत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

‘लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे. कंपन्या ठप्प होत आहेत. तरीही भाजप सरकार गप्प आहे, त्यांची हीच शांतता धोकादायक आहे. असे त्यांनी ट्विटद्वारे म्हणले आहे.

देशातल्या या मोठ्या आर्थिक मंदीला जवाबदार कोण ? असा सवालही त्यांनी केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post