लोकलच्या प्रवाशांची होणार गैरसोय; पुणे-लोणावळा दरम्यान महिनाभर ब्लॉक


वेब टीम : पुणे
मध्य रेल्वेच्या पुणे-लोणावळा विभागात ३० सप्टेंबरपर्यंत प्रतिदिन तीन तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

 त्यामुळे दुपारी पुणे आणि लोणावळा रेल्वे स्थानकातून सुटणारी लोकल तळेगावपर्यंतच धावणार आहेत. या ब्लॉकमुळे पुन्हा एकदा लोकलच्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रेल्वरुळांची देखभाल दुरूस्ती, पथदिवे यंत्रणा, तसेच इतर यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी हा ब्लॉक घेणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे करणे आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. पुणे रेल्वे स्थानकातून दुपारी एक वाजता सुटणारी लोकल केवळ तळेगावपर्यंतच धावणार आहे.

ही लोकल महिनाभरासाठी तळेगाव ते लोणावळा दरम्यान रद्द असेल. तसेच दुपारी दोन वाजता लोणावळा येथून पुण्यासाठी रवाना होणारी लोकल तळेगावपर्यंत धावेल, तळेगाव ते पुणे दरम्यान ही गाडी महिनाभरासाठी रद्द आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post