आर. आर. पाटलांच्या पुतळ्याचे एक सप्टेंबरला होणार अनावरण


वेब टीम : सांगली
तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण एक सप्टेंबर रोजी होत आहे.

पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील, सुरेश पाटील यांच्यासह आबा कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

आर. आर. पाटील यांचा पुर्णाकृती तासगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आला आहे. पुतळा अनावरणासाठीची तयारी युध्दपातळीवर सुरु आहे.

पुतळा अनावरण कार्यक्रमाचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिका-यांनी कंबर कसली आहे.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते शंकरदादा पाटील, सभापती ॲड जयसिंग जमदाडे, पंचायत समिती सभापती मनिषा माळी, उपसभापती संजय जमदाडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डी. के. पाटील, अमोल शिंदे, बाजार समितीचे संचालक तसेच पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post