घाटमाथ्यावर सलग चार दिवस मुसळधार पाऊस पडणार


वेब टीम : नाशिक
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागातील घाटमाथ्यावरील काही भागात सलग चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, विदर्भातील बहुतांश ठिकाणी दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने नमुद केले आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. अर्थात काही भागात पाऊस बरसत असला तरी त्याचे प्रमाण किरकोळ आहे.

अजुनही राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील भाग, विदर्भातील पश्चिम भाग, उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावलेली नाही.

 त्यामुळे या भागात पावसाळा संपत आला, तरी पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

सध्या ओरिसा आणि आसपासच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा प्रभाव कायम आहे.

तसेच 28 ऑगस्टपर्यत बंगालच्या उपसागरातील उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पाऊस बरसणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post