माजी आ. अनिल राठोड यांची उद्या होणार सुटका; विखेंनी घेतली भेट


वेब टीम : अहमदनगर
बूट फेक प्रकरणाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर हा जामीन देण्यात आला आहे.

दरम्यान, जामीन मंजूर झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल, माजी खासदार दादापाटील शेळके, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर आदींनी जिल्हा रुग्णालयात राठोड यांची भेट घेतली.

बोल्हेगाव येथील रस्त्याच्या कामावरून झालेल्या आंदोलनावेळी शिवसैनिकांनी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासमोर बूट भिरकावला होता. या प्रकरणी राठोड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post