वेब टीम : दिल्ली भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोण विराजमान होणार या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. विद्यमान मुख्य प...
वेब टीम : दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोण विराजमान होणार या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेच २०२१मध्ये भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत कायम राहणार आहेत.
क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) शास्त्री यांच्या पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत अनेक दिग्गज नावे होती. माईक हेसन, टॉम मूडी व रवी शास्त्री यांच्यात अंतिम चुरस होती.
कपिल देव, अंशुमन गायकवाड व शांता रंगास्वामी यांच्या समितीने शास्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. हेसन यांना दुसऱ्या तर मुडी यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली.
भारतीय संघाला नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता, त्यानंतर प्रशिक्षक बदलाची शक्यता होती. मात्र शास्त्रीबुवांच्या गळ्यात पुन्हा ही माळ पडली.