दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍यामध्ये बदल


वेब टीम : दिल्ली
दक्षिण आफ्रिकेच्या आगामी भारत दौर्‍यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. कसोटी मालिकेतल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यांची ठिकाणे बदलण्यात आलेली आहेत.

बीसीसीआयने आधी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार, दुसरा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान रांची येथे खेळवण्यात येणार होता. याचसोबत तिसरा कसोटी सामना 19 ते 23 ऑक्टोबरदरम्यान पुणे येथे खेळवण्यात येणार होता.

मात्र रांची येथील दुसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान, झारखंड राज्यात दुर्गा पुजेचें आयोजन करण्यात येते. या दरम्यान कसोटी सामन्याचे आयोजन आणि सामन्यासाठी सुरक्षा पुरवणे शक्य होणार नसल्याचे झारखंड क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला कळवले होते.

यानंतर क्रिकेट प्रशासकीय समिती आणि राज्य संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीनंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्याची ठिकाणें बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नवीन बदलांनुसार, 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान होणारा कसोटी सामना रांचीऐवजी पुणे तर 19 ते 23 ऑक्टोबरदरम्यानचा कसोटी सामना पुण्याऐवजी रांचीला खेळवण्यात येणार आहे.

15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍याला सुरुवात होणार आहे. या दौर्‍यात दोन्ही संघ 3 टी-20 आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post