'साकळाई'चे खरे शत्रू बबनराव पाचपुतेच


वेब टीम : अहमदनगर
तत्कालीन मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यावेळी साकळाईची नकार घंटा वाजवली असून त्यांचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. 

बबनराव पाचपुतेच साकळाईचे एक नंबरचे शत्रू आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला. ते लाबाडीत माहिर असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी साकळाईचा कळवळा आला आहे. सत्ताधारी साकळाईचा मतांसाठी वापर करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही शेलार यांनी केला.

आमदार राहूल जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडली. त्यावर माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची वाळकी येथील घोषणा आणि जलसंपदा मंत्र्यांचे उत्तर यात फरक असल्याने सरकारला कोंडीत पकडले. त्यावर बबनराव पाचपुते यांनी अजित पवार यांवर टिका केली की १५ वर्ष राष्ट्रवादीला साकळाई का दिसली नाही. 

पण पाचपुतेही त्या काळी राष्ट्रवादीचे मंत्री पद उपभोगत होते हे ते सोईस्कर विसरले. त्यावेळी मी अजित पवार यांच्या माध्यमातून साकळाई साठी ३ वेळा बैठका लावल्या. तर हेच बबनराव पाचपुते नकार घंटा वाजवत होते. 

ते स्वत:ला वारकरी म्हणतात मग पांडूरंगाच्या चरणी हात ठेवून त्यांनी शपथ पूर्वक सांगावे हे खरे की खोटे. बबनराव पाचपुते जनतेची दिशाभूल करत आहेत. ते लबाडीत माहीर आहेत. साकळाईचे खरे श़ूत्रू नंबर १ पाचपुतेच असून ते सत्तेत असतील तर साकळाई होणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post