तहसीलदारांच्या अंगावर डंपर घालून फरार झालेला वाळूतस्कर पोलिस मुख्यालयातच पकडला


वेब टीम : अहमदनगर
वाळू तस्करी रोखण्यासाठी गेलेले पारनेर तहसीलदार प्रविण चव्हाणके यांच्यावर वाळूचा डंपर घालणार व अधिकारी कर्मचारी यांचाशी कारवाई करताना भांडणे करून  सरकारी कामात अडथळा करणाऱ्या वाळू तस्कर बापू बन्सी सोनवणे याला पारनेर पोलिसांनी नगरच्या पोलिस मुख्यालयातूनच शनिवार (दि.२३) सांयकाळी ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला हा आरोपी पोलिस मुख्यालयात पोहचला कसा व कशासाठी याबाबत पोलिस वर्तुळातच उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान पारनेर पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 याबाबत समजलेली माहिती अशी की,भाळवणी परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याची माहीती मिळल्याने वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पारनेरचे तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्यावर वाळुचा  डंपर घालण्याचा  व अधिकारी कर्मचारी यांचाशी कारवाई करताना भांडणे घालण्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.

त्यानुसार  वाळू तस्कर बापू बन्सी सोनवणे याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासुन हा आरोपी फरार होता. पारनेर पोलिसांचे एक पथक या आरोपीच्या मागावर असताना हा आरोपी नगरच्या पोलिस मुख्यालयात आल्याची खबर पारनेर पोलिसांना मिळली.

त्यांनी या आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. तहसिलदार फिर्यादी असलेल्या या गुन्ह्यातील आरोपी पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या निवासस्थानात हा आरोपी असल्याची खबर पारनेरचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना समजताच या आरोपीचा माग घेण्यासाठी पारनेर पोलिसांच्या पथकाने पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या निवासस्थानाबाहेर सापळा लावला.

या निवासस्थानातून आरोपी बाहेर येताच पारनेर पोलिसांनी अटक केली.हा आरोपी पोलिस मुख्यालयात कशासाठी आला होता याबाबत पोलिस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post