सांगली जिल्ह्यात १८ हजार ९२३ पूरबाधित कुटुंबाना गहू, तांदूळ व केरोसिनचे वितरण


वेब टीम : सांगली
जिल्ह्यात पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ आणि केरोसीनचे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.

यामध्ये मिरज तालुक्यातील 6 हजार 152 कुटुंबाना 615.2 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ व 3975 लिटर केरोसिन, महानगरपालिका क्षेत्रात 2971 कुटुंबाना 297.1 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, वाळवा तालुक्यातील 4297 कुटुंबाना 429.7 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, व 4390 लिटर केरोसिन, शिराळा तालुक्यातील 575 कुटुंबाना 57.5 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, आणि पलूस तालुक्यात 4928 कुटुंबानां 492.2 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ आणि 90 लिटर केरोसिन वितरित करण्यात आले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post