अखेर राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांनी हाती घेतला 'धनुष्यबाण'


वेब टीम : अहमदनगर
बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातच जगतापांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

अशातच आमदार जगताप यांनी एका कार्यक्रमादरम्यान धनुष्यबाण हाती घेतल्याने उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता. निमित्त होते ते क्रीडा संघटनांच्या वाडिया पार्क येथील आंदोलनाचे. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड हेही शेजारीच उभे होते.


आंदोलनाच्या वेळेस खेळाडूंनी विविध प्रकारचे क्रीडा साहित्य आणले होते. जगताप यांनी धनुष्यबाण चालवून पहिला. जगताप यांचा नेम नेमका कुठे होता? याबाबत खमंग चर्चा यावेळी सुरू होती.


विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आमदार संग्राम जगताप यांनी लावलेला हा धनुष्यबाणाचा नेम त्यांना त्यांच्या निश्चित लक्ष्यापर्यंत पोहोचवणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post