फुलसौंदर यांची कारकीर्द संपवण्यासाठी खोटा गुन्हा : चौकशीसाठी आ. जगताप यांचे पोलिसांना पत्र


वेब टीम : अहमदनगर
शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर व इतरांवर जागेच्या वादातून खोटा गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे. याबाबत योग्य ती चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.

आ. जगताप यांनी पत्रात म्हटले की, फुलसौंदर हे राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतात. ऐतिहासिक अहमदनगर शहराचे प्रथम महापौर म्हणून त्यांनी पद भुषवलेले आहे व त्यांचे समाजात चांगले स्थान आहे.

त्यामुळे त्यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला आहे, त्याबाबत योग्य ती चौकशी करावी. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याचीही जिल्हा पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी.

एखाद्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, व्यापारी, प्रतिष्ठीत व्यक्ती यांची कारकीर्द संपविण्याच्या दृष्टिने असले प्रकार घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

त्यामुळे भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याबाबत योग्य ती चौकशी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post