शाहू मोडक करंडक एकांकिका स्पर्धेत तरुणाईच्या अविष्काराने दुमदुमणार रंगमंच


वेब टीम : अहमदनगर
नाट्य जल्लोष आणि कला यात्रिक, आयोजित नटश्रेष्ठ शाहू मोडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा 2019 अवघ्या 8 वर्षात प्रचंड लोकप्रिय व महाविद्यालयीन सांस्कृतिक क्षेत्रात मानबिंदू असलेली ही स्पर्धा यंदा 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी नगरच्या माऊली सभागृहात रंगणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक प्रसाद बेडेकर यांनी दिली.

सुरवातीला फक्त नगर जिल्ह्यापुरती मर्यादित असलेली हि स्पर्धा गेल्या दोन वर्षापासून औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यांना पण खुली करण्यात आली आहे. यंदा यात बीड जिल्ह्याचीसुद्धा भर पडली आहे, अशी माहिती अमित खताळ यांनी दिली.

या स्पर्धेसाठी यंदा नगर, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, शेवगाव, बेलापूर, राहुरी बीड, औरंगाबाद आणि नाशिक येथून अनेक महाविद्यालयांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. यावर्षी एकूण 30 प्रवेशिका आल्या होत्या, मात्र त्यातील प्रथम येणार्‍या 18 संघाना प्रवेश देण्यात आला आहे, असे अमोल खोले यांनी सांगितले.

31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता स्पर्धेचे उद्घाटन गौतम मुनोत, लेखक अमित बैचे, अभिनेते हरीश दुधाडे, डॉ.कुणाल कोल्हे आणि किर्ती कोल्हे, श्रीमती सुशिला मोडक, श्रीमती सुलभा मोडक आदी पाहुण्यांच्या हस्ते होईल. स्पर्धेसाठी गौतम मुनोत प्रोडक्शन्स मुख्य प्रायोजकत्व दिले असून आणि स्माईल केअरने सहप्रायोजकत्व दिले आहे. तसेच शुभ फ्लॉवर्स, ब्रँड मेकर किरण गवते, अभिषेक शेलार, भूमिका ग्रुप यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झालेली असून, स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नगरमधील सर्व नाट्यकर्मी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती स्पर्धेचे पी.डी.कुलकर्णी यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post