पुरग्रस्तांसाठी साईंच्या झोळीतून १० कोटी


वेब टीम : शिर्डी
साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी न्‍यायालयीन प्रक्रियेत अधिन राहून मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.

राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती आहे. या जलप्रलयामुळे विशेषत: पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापुर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे.यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उध्‍वस्‍त झाली.

ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजुन या पुरग्रस्‍तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने घेतला आहे. सदरचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असून संस्‍थानच्‍या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधे ही पाठविणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post