आता अवघड झालं, चक्क पोलीस मुख्यालयातूनच चोरी


वेब टीम : अहमदनगर
शहरासह उपनगरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत असून पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे चोरट्यांचे साहस वाढल्याने चोरांनी चक्क पोलिस मुख्यालयातूनच ‘हात की सफाई’ दाखविल्याची घटना समोर आली.

पोलिस मुख्यालयाच्या मैदानाजवळून 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व कागदपत्रे असलेली बॅग कोणीतरी अज्ञात चोराने पळवून नेल्याची घटना गुरुवारी (दि.22) सकाळी 7.30 ते दुपारी 1 वाजेदरम्यान घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन मंजाबापु मुळे (वय 22, रा.शिराळ, ता.पाथर्डी) याने त्याची बॅग पोलिस मुख्यालयातील मैदानाजवळ असलेल्या भोजनालयाच्या गेटवर ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने मुळे यांची बॅग व आतील 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन व महत्वाची कागदपत्रे चोरुन नेले.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सचिन मुळे यांच्या फिर्यादीवरुन भादविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास पो.ना.आव्हाड हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post