एनपीए’ वाढल्यामुळे रिझर्व बँकेकडून नगर अर्बन बँकेवर प्रशासक


वेब टीम : अहमदनगर
नगर अर्बन बँकेत  आर्थिक अडचणी नाहीत. बँकेच्या ठेवीदारांनी घाबरण्याची आवश्यक ता नाही. बँकेचा ‘एनपीए’ वाढल्यामुळे रिझर्व बँकेने प्रशासक म्हणून माझी नियुक्ती केली आहे, अशी माहिती नगर  बँकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिली.

मिश्रा म्हणाले की, बँकेवर प्रशासक नियुक्त केले म्हणून ठेवीदारांनी घाबरून नये. बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. ‘एनपीए’ वाढल्यामुळेच रिझर्व बँकेने थोड्या कालावधी साठी  माझी नियुक्ती केलेली आहे. सर्व बँकेचा व्यवहारांची तपासणी केल्यानंतर  बँकेचे संचालक मंडळ पुन्हा बँकेचा कारभार पूर्ववत पाहतील, असे मिश्रा यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post