#Article370 : देशभरात हाय अलर्ट जारी !


वेब टीम : दिल्ली
जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द केल्याच्या पार्श्‍वभूमीवर अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्व राज्यांच्या सुरक्षादलांना सतर्क राहण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरला रवाना झाले आहेत.

जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काश्मीरसह देशभरात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षा दलांना अत्युच्च सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. गृह मंत्रालयाने विविध राज्यांमध्ये वास्तव्यास असणार्‍या काश्मिरी नागरिकांची आणि विद्यार्थी यांची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे.

कायदा व सुव्यवस्था भंग करण्याच्या हेतूने समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात येणार्‍या अफवा, खोट्या बातम्या आणि चुकीचे संदेश याविरोधातही योग्य ती कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे समाजात विश्‍वास निर्माण करणे आणि जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचविण्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही आदेश गृह मंत्रालयातर्फे देण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post