Bajajने लॉन्च केली Pulsar 125 Neon, पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत फीचर्स


वेब टीम : दिल्ली
बजाज कंपनीने नवी पल्सर बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या बाईकचं नाव बजाज पल्सर 125 निऑन असं आहे.

बजाज कंपनीने पल्सरचं 125 cc व्हेरिएंट असलेली ही पल्सर निऑन लॉन्च केली आहे.  पल्सर 125 निऑन ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. या बाईकची सुरुवाती किंमत 64 हजार रुपये (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे.

125 निऑन (Bajaj Pulsar 125 Neon) ही बाईक दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये ड्रम ब्रेक व्हेरिएंट आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंट यांचा समावेश आहे.

ड्रम ब्रेक व्हेरिएंट बाईकची किंमत ही डिस्क ब्रेक बाईकच्या किमतीपेक्षा थोडी कमी आहे. दिल्लीतील एक्स शोरूममधील किमतीनुसार ड्रम ब्रेक बाईकची किंमत 64,000 रुपये आहे तर डिस्क ब्रेक बाईकची किंमत 66,618 रुपये इतकी आहे.

ही बाईक तीन रंगांत उपलब्ध होणार आहे. या तीन रंगांमध्ये निऑन ब्ल्यू, सोलर रेड आणि प्लॅटिनम सिल्वर या रंगांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post