जगभरात येत्या ९ महिन्यांत येणार मंदी


वेब टीम : दिल्ली
अमेरिकेची आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकिंग कंपनी मॉर्गन स्टेनलीने पुन्हा एकदा जगभरात आर्थिक मंदी येण्याचे संकेत दिले आहेत. मार्गन स्टेनली या बँकेच्या मते, जगभरातील अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे लवकरच जागतिक मंदी येण्याची चिन्हे आहेत.

येत्या 9 महिन्यात ही मंदी येणार असल्याची शक्यताही मॉर्गन स्टेनली या बँकेने वर्तवली आहे. भारतात मंदीची चिन्हे दिसत नसली तरी वाहन उद्योगासारखे क्षेत्र प्रचंड तोट्यात आहे.

जगभरातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था या मंदीसाठी जबाबदार आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध हेच मंदी येण्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. जर अमेरिकेने पुन्हा एकदा व्यापार युद्धाला तोंड फोडले आणि चीनला आयात करणार्‍या सर्वच वस्तूंवर 25 टक्के जास्त कर द्यावा लागल्यास जगभरात मंदीचे ढग दाटू शकतात.

बॉंड यील्डच्या ग्राफचे चक्र जेव्हा उलटं फिरू लागले होते, तेव्हाही 2008 मध्ये आर्थिक संकट ओढवले होते. परंतु भारतात मंदी येण्याचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. फक्त वाहन उद्योगांसारख्या क्षेत्रात जबरदस्त मंदी आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या तीन महिन्यांमध्ये घसरण झाली असून देशाचा विकासही मंदावला आहे. औद्योगिक उत्पादन आणि कोअर इन्फ्रास्ट्रक्चर दोन्ही क्षेत्रात मोठी घसरण झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post