शिवसेना-भाजप 20-25 जागांची अदलाबदली करणार


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकता याव्यात यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रणनिती आखत आहेत.

दोन्ही पक्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे नव्याने भरती केलेल्या नेत्यांना मतदारसंघ उपलब्ध करुन देण्यासाठी दोन्ही पक्ष तडजोड करत असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेना – भाजपमध्ये 20 ते 25 जागांची अदलाबदली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन्ही पक्षात झालेलं इनकमिंग आणि मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी या निकषांवर ही अदलाबदली होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates