अभिनंदन इज बॅक : मिग-२१ मधून घेतली ‘भरारी’


वेब टीम : पठाणकोट
पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-१६ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी सोमवारी एअर फोर्स प्रमुख बी.एस.धनोआ यांच्यासोबत मिग-२१ विमानामधून उड्डाण केले.पंजाबच्या पठाणकोट एअरबेस वरुन वर्धमान आणि धनोआ यांनी मिग-२१ मधून उड्डाण केले.

बालाकोट एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी लढाऊ विमानांबरोबर झालेल्या डॉगफाइटमध्ये अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते.

विमान कोसळण्यापूर्वी अभिनंदन यांनी क्षेपणास्त्र डागून पाकचे एफ-१६ विमान पाडले.या कामगिरीबद्दल वर्धमान यांना वीर चक्र पुरस्काराने गौरवले.

अभिनंदन वर्धमान २७ फेब्रुवारीला मिग-२१ मधून इजेक्ट झाल्यानंतर पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना ते जखमी झाले होते.

आज ते तब्बल सहा महिन्यानंतर दुखापतीवर मात करुन अभिनंदन कॉकपीटमध्ये परतले.अभिनंदन यांना राजस्तानमधील आयएएफच्या तळावर तैनात केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post