अण्णांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल


वेब टीम : अहमदनगर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना शिरूर येथील वेदांत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

उपचारानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

आज सकाळी सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांना शिरूर येथील वेदांत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सध्या अण्णा हजारे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना अशक्तपणा आला आहे. तसेच कफ आणि निमोनिया झाला असल्याचे डॉक्टर धनंजय पोटे यांनी सांगितले आहे.

दरम्यान अण्णा यांची प्रकृती ठीक असून त्यांना कुठलाही धोका नसल्याचेही पोटे यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post