ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाच्या खात्यात


वेब टीम : सिडनी
ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लंड संघाचा १८५ धावांनी पराभव केला. मालिकेत २-१ अशी आघाडी घेत ऑस्ट्रेलियाने ॲशेस राखल्या आहेत.

याआधीची ॲशेस ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने ही मालिका बरोबरीत सुटली तरी ॲशेसचा करंडक ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे.

दुसऱ्या डावात ३८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ १९७ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ गडी बाद करत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले.

त्यानंतर जोश हेजलवूड आणि नॅथन लायनने प्रत्येकी २ गडी बाद केले. तर मिशेल स्टार्क आणि मार्नस लाबुशेननेही प्रत्येकी १ गडी बाद करत सुरेख साथ दिली. इंग्लंडकडून जो डेनलीने सर्वधिक ५३ धावा केल्या.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टीव्ह स्मिथच्या दमदार द्विशतकामुळे (२११) ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४९७ धावांचा डोंगर उभा केला.

 इंग्लंडचा पहिला डाव ३०१ धावांत संपुष्टात आल्यामुळे ऑस्ट्रेलियाला १९६ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १८६ धावा करत डाव घोषित केला. ३८३ धावांच्या आव्हानासमोर इंग्लिश फलंदाज केवळ १९७ धावा करू शकला.

त्यामुळे त्यांचा पराभव झाला. द्विशतकवीर स्टीव्ह स्मिथ सामन्याचा मानकरी ठरला. आता अखेरची कसोटी १२ सप्टेंबरपासून ओव्हल मैदानावर खेळवली जाईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post