भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी


वेब टीम : मुंबई
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मावळते राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ ३० ऑगस्ट २०१९ रोजी संपल्याने त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली.

कोण आहेत कोश्यारी ?
उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते असलेले कोश्यारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला होता. कोश्यारींनी १९७७ मध्ये आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यावर ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते.

 २००१ ते २००२ या कालावधीसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्रीपद तर २००२ ते २००७ पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपदही भूषवलं. २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते. त्यांनी इंग्रजी साहित्यातून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते शिक्षक आणि पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post