नगर जिल्ह्यातल्या 'या' तालुक्यात भाजपला प्रचंड गळती; कार्यकर्ते विरोधकांना सामील


वेब टीम : अहमदनगर
राज्याच्या विविध भागांत काँग्रेस-राष्ट्रवादीचा त्याग करून भाजप-सेनेत प्रवेशाचे पेव फुटलेले असताना नेवासा तालुक्यात मात्र मोठ्या प्रमाणावर प्रामुख्याने युवक वर्ग गडाखांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडे आकर्षित होऊन जोरदार ‘इनकमिंग’ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

नेवासा, भेंडा, कुकाणासह आमदार मुरकुटेच्या होमपीचवर देवगावात प्रामुख्याने भाजपला खिंडार पडले असल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादीचा त्याग केल्यानंतर माजी आमदार शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात स्वतःला सिद्ध केले आहे.

 तालुक्यातील मुळा साखर कारखाना, नेवासा बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे पाच गट, मुळा बँक, एवढी सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात आहेत. गडाख स्वतः आमदार असताना तालुक्यातील पाटपाणी, वीज आदी प्रश्नांची त्यावेळची आणि आताची परिस्थितीतील फरक दाखवून देण्यात त्यांना मोठे यश मिळाल्याचे दिसून आले आहे.

पराभवाला कुरवाळत बसण्यापेक्षा लोकांनी दिलेला कौल प्रमाण मानून ज्या मतदारांनी विश्वास दाखवला त्याला जागून त्यांनी सक्षम विरोधकाची भूमिकाही तेव्हढ्याच ताकदीने निभावली असल्याचे पहावयास मिळाले.

गेल्या पाच वर्षांच्या काळात त्यांनी पाटपाणी, वीज, हमीभाव, कर्जमाफी, दुष्काळी अनुदान, पीकविमा तसेच पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनांनी शासन यंत्रणा हादरून गेली होती. या आंदोलनादरम्यान वेळोवेळी त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना पोलीस स्टेशन, न्यायालयात खेट्या मारण्याची वेळ ओढवली तरीही त्यांनी सर्वसामान्यांशी असलेली बांधिलकी सोडली नाही.

 आमदार असताना मितभाषी, शांत, संयमी म्हणून परिचित असलेले गडाख गेल्या पाच वर्षांत एक अभ्यासू आणि आक्रमक विरोधी नेता म्हणूनही अनुभवयास मिळाले. सामाजिक प्रश्नांवर पराकोटीचा संघर्ष करावा लागला आणि कितीही राजकीय दबाव, दडपणे आली तरी तत्वापासून तसूभरही मागे न हटणारा नेता म्हणून त्यांची छबी लोकप्रिय झाली नसेल तरच नवल. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post