जात वैधता प्रमाणपत्रासाठी पाच लाखाची लाच; चौघांना अटक


वेब टीम : अहमदनगर
अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्या प्रकरणी नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या उपसंचालकासह चौघांना अटक झाली.ही कारवाई अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

एसटी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी नाशिकच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपसंचालक रामचंद्र रतीलाल सोनकवडे, विधिअधिकारी शिवाप्रसाद मुकुंदराव काकडे, खासगी चालक विनायक उर्फ सचिन उत्तमराव महाजन आणि लॅब बॉय मच्छिंद्र मारुती गायकवाड या चार संशियत आरोपींनी एका व्यक्तिकडून पंचासमक्ष पाच लाखांची लाच मागितली होती.

त्यानंतर विनायक महाजन आणि मच्छिंद्र गायकवाड यांनी ५ सप्टेंबर रोजी शिर्डीतील हॉटेल साई आसरा हॉटेलमध्ये ही रक्कम स्विकारली असता अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात रामचंद्र सोनकवडे आणि शिवाप्रसाद काकडे यांचाही सहभाग आढळल्याने त्यांनाही ताब्यात घेतले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post