वेब टीम : नाशिक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अविनाश आदिक यांच्या वाहनातून नाशिकच्या भरारी पथकाने साडेचार लाख रुपयांच...
वेब टीम : नाशिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अविनाश आदिक यांच्या वाहनातून नाशिकच्या भरारी पथकाने साडेचार लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
निवडणूक यंत्रणेच्या पथकाने नाशिकमधील शिंदे पळसे गावागवळ ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या भरारी पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असतांना शिंदे गावात नाशिक पोलिसांनी एमएच 17 सीडी 3149 या वाहनातून रोकड जप्त केल्याची माहिती आहे.
वाहनातील एका बॅगेत ही 4.58 लाखांची रोकड होती. रकमेबाबत आदिक यांच्याकडून कोणतेही समाधानकार पुरावे न मिळाल्याने भरारी पथकाचे प्रमुख मच्छिंद्र कांगणे यांनी ही रक्कम ताब्यात घेऊन कोषागार कार्यालयात जमा केली असल्याचे समजते.
दरम्यान, सदरची रक्कम कुठून व कशी आली याचा तपशील सोमवारी सादर करणार आहे. त्यानंतर सदरची रक्कम परत मिळेल, असा दावा अविनाश आदिक यांच्याकडून केला जात आहे.