चांद्रयान २ : निराश होऊ नका, देश तुमच्या पाठीशी : मोदींनी दिला धीर


वेब टीम : बेंगळुरू
चांद्रयानाशी संपर्क तुटला असला तरी निराश होऊ नका. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिला.

मोदी म्हणाले की, मोहीमेशी संबंधित प्रत्येक व्यक्ती वेगळ्या मनस्थितीत आहे, अनेक प्रश्न होते, मोठ्या यशासोबत पुढे जात होता. अचानक काहीही दिसेनासं झालं, मी देखील तो क्षण तुमच्यासोबत जगलो.

चंद्राला कवेत घेण्याची आपली इच्छाशक्ती आणि इरादा आणखी दृढ झाला आहे. देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कुणी विसरु शकणार नाही.

तुम्ही लोण्यावर रेघ मारणारे नाही तर दगडावर रेघ लोक आहात. मी आधीही सांगितलंय, आताही सांगतो, मी तुमच्यासोबत आहे, देश तुमच्यासोबत आहे.

चांद्रयान 2 चा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता. चांद्रयान 2 चा प्रवास शानदार, अनेक अडचणींतून यश मिळालं.

विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही. अंतराळ क्षेत्रात भारत अग्रणी आहे, यासाठी वैज्ञानिकांचं अतुलनीय योगदान आहे.

आपल्याला यश नक्कीच मिळणार, या मोहीमेच्या पुढच्या प्रयत्नातही आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रयत्नान यश आपल्यासोबत असेल.

चांगल्या कामासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न एक नवीन धडा शिकवतो, चांद्रयानाच्या माध्यमातूनही आपल्याला खूप शिकायला मिळालं.

लवकरच आपल्या हाती चांगला निकाल येईल, आपला इतिहास उज्वल आहे, हार मानण्याची आपली संस्कृती नाही.

निकाल आपल्या जागी, पण मला आणि संपूर्ण देशाला आपल्या वैज्ञानिक, इंजिनिअरच्या प्रयत्नांचा अभिमान आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates