विधानसभा निवडणूक : काँग्रेसची पहिली उमेदवार यादी आज होणार जाहीर

File photo

वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. काँग्रेस १२५, राष्ट्रवादी १२५ आणि मित्रपक्ष ३८ जागांवर लढणार आहेत, असेही थोरात यांनी म्हटले आहे.

भाजपा आणि शिवसेनेतील युती अद्यापि जाहीर झाली नसतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी १२५ जागा आणि घटक पक्षांना ३८ जागा जाहीर करून आघाडी घेतली.

त्यातच आता काँग्रेसच्या ५० उमेदवारांची पहिली यादी येत्या २० तारखेला जाहीर होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत दिली आहे. काँग्रेसच्या छाननी समितीची चौथी बैठक बुधवारी दिल्लीत पार पाडली.

त्यानंतर थोरात यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. शिवसेना आणि भाज पामधील जोरदार इनकमिंगमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड पडले असले तरी आघाडीने हार मानलेली नाही. .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post