आघाडीचं जमलं : काँग्रेस - राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ तर मित्रपक्षांना ३८ जागा


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष १२५-१२५ जागा लढवणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाशिक दौऱ्यावर असताना ही माहिती दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून आता युतीच्या जागावाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही प्रमुख पक्ष १२५-१२५ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत.

तर मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येणार आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. यामध्ये काही जागांची अदलाबदल करण्यात येणार आहे. तसेच यंदा नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप, जोगेंद्र कवाडे, राजू शेट्टी, आणि इतर डावे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post