स्वस्तात सोने देतो म्हणून बोलवायचे अन् संधी पाहताच लुटायचे; पोलिसांनी केले जेरबंद


वेब टीम : अहमदनगर
स्वस्तात सोने देण्याचे अमीष दाखवून लुटमार करणार्‍या टोळीतील चौघांना बेलवंडी पोलिसांनी शिताफीने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.18) चिखली घाटात केली.

या कारवाईत हर्षद हावर्‍या काळे (देऊळगाव सिद्धी, ता.पारनेर), अकबर उर्फ जनैद्दीन बनूलाल शेख (रा.हिवरे झरे, ता.पारनेर), मंगेश भिकन बोरसे (रा. साकुरा, नाशिक), नवनाथ भाऊसाहेब निपते (रा.वडझिंग, औरंगाबाद) यांना अटक केली.

 असून त्यांच्याकडील सत्तुर, मिरची पुड, लोखंडी रॉड, काठ्या व बोलेरो जिप क्र.एम. एच.14 डी.ए.8383 असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाई शंभू कुंजा चव्हाण, श्रीधर कुंजा चव्हाण, शब्बीर कुंजा चव्हाण, हबर्‍या आशा काळे, शरद आशा काळे, लायसन टकसाळू भोसले व केशव किरण भोसले हे पसार झाले.

याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post