आईशी भांडण करूण मुलाने केली आत्महत्या


वेब टीम : अहमदनगर
कॉलेज फी वरून आईशी भांडण झाल्याने मुलाने मुळा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली़.

कोंढवड (ता़. राहुरी) येथे शुभम किशोर बनसोडे (वय २०) असे विद्यार्थ्याचे नाव आहे़ कोंढवड येथे पुलाजवळ बुधवारी मृतदेह आढळून आला.

मयत शुभम हा मुळचा सलबतपूर (ता़ नेवासा) येथील रहिवासी आहे. वडील मयत झाल्यानंतर आई, बहिणीसह कोंढवड येथे मामा विनोद शेजवळ यांच्याकडे आला होता़.

आई मोलमजुरी करून उपजिविका करते़. गणेश उत्सवाच्या काळात शुभमला राहुरी महाविद्यालयात फी भरण्यासाठी रक्कम दिली होती़. मात्र वेळेत फी न भरल्याने दंड आकारण्यात आला होता़. त्यामुळे आईशी शुभमचे भांडण झाले होते़.

 शुभम बनसोडे हा राहुरी महाविद्यालयात बी़ कॉमचे शिक्षण घेत होता़. आई बोलल्याचा राग सहन न झाल्याने शुभम घरातून बाहेर पडला होता़.

 घरी न आल्याने शोधाशोध सुरू होती़  बुधवारी मुळा नदीपात्रात कोंढवड येथे शुभमचा मृतदेह आढळून आला़

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post