नोकरीच्या आमिषाने हॉटेलमध्ये बोलवून बलात्कार


वेब टीम : मुंबई
बँकेत एचआर पदी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना मुलाखतीसाठी हॉटेलच्या रुममध्ये बोलावून घेतले.

तेथेच २८ वर्षाच्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जुहूमध्ये उघडकीस आली आहे.

याप्रकरणी जुहू पोलिसांनी साहिलसिंग अरोरा याला अटक केली आहे.

मुळची उत्तरप्रदेश येथील रहिवासी असलेली तक्रारदार तरुणी एमबीए झाली आहे. नोकरीच्या शोधात गेल्या वर्षी तिने मुंबई गाठली.

मुंबईत खासगी कंपनीत नोकरी मिळाली. त्यानंतर काही महिन्यानंतर तिने पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला. पुढे आॅनलाईन नोकरीचा शोध सुरु असताना, जुलैमध्ये ती अरोराच्या संपर्कात आली.

त्याच दरम्यान आरोपीने तिला अंधेरीतील एका नामांकीत बँकेत एचआर पदी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

 तिला १९ तारखेला रात्री ११ च्या सुमारास मुलाखतीसाठी विलेपार्ले पश्चिमेकडील किंग्स इंटरनॅशनल हॉटेलच्या रूम नं. 511 मध्ये बोलावून घेतले.

 तेथे मुलाखतीच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तरुणीच्या तक्ररीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post