नाशिकमध्ये गणेश विसर्जनावेळी तीन जण बुडाले


वेब टीम : नाशिक
गणेश विसर्जन करताना गंगापूर गावानजीक असलेल्या सोमेश्वर धबधबा परिसरात बुडाल्याची घटना घडली.

दरम्यान, यातील दोघांना जीवरक्षक दल व अग्निशमनच्या जवानांनी वाचवले असून एकजण मात्र बेपत्ता असल्याचे समजते.

तर पहिने येथे चौघे बुडाले होते यातील दोघे बाहेर आले तर इतर दोघे बेपत्ता असल्याचे कळते.

सोमेश्वर धबधब्यानजीकची बातमी ताजी असतानाच रामकुंडाजवळ संत गाडगे महाराज पुलाखाली एका गणेश भक्ताने पोहोण्यासाठी उडी घेतली.

 मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला होता. त्यास जीवरक्षक दलाच्या नागरिकांनी वाचवले.  प्रशांत पाटील (वय ३८) असे या व्यक्तीचे नाव आहे.

यासोबतच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे येथे नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी सुमारे पंचवीस जण आले होते.

तिथेही चौघांनी गणपती विसर्जन करण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या मात्र, यातील दोघे बाहेर आले दोघे बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post