वेब टीम : सोलापूर वयोमानामुळे विधानसभा निवडणूक लढवणे शक्य नाही, शेकापने दुसरा उमेदवार बघावा असे सांगत सलग 11 वेळा सांगोला विधानसभेचे प्...
वेब टीम : सोलापूर
वयोमानामुळे विधानसभा निवडणूक लढवणे शक्य नाही, शेकापने दुसरा उमेदवार बघावा असे सांगत सलग 11 वेळा सांगोला विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी अखेर आपला राजकीय वारसदार जाहीर केला.
घटस्थापनेच्या दिवशी शेकापचे सरचिटणीस व जेष्ठ नेते जयंत पाटील आणि आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला येथे पत्रकार परिषद घेऊन फॅबटेक उद्योग समूहाचे प्रमुख व उद्योजक भाऊसाहेब रुपनर सांगोला विधानसभेचे उमेदवार असतील आणि तेच शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवतील अशी घोषणा केली.
वयाच्या ९४व्या वर्षी गणपतरावांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. आमदार गणपतराव एकदाचे थांबल्याने शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील व राष्ट्रवादीचे विधानपरीषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आमदार गणपतरावांच्या संन्यासाने आणि रूपनर यांच्या येण्याने सांगोला विधानसभा निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.
गणपतराव देशमुख रिंगणात असते तर निवडणूक एकाकी झाली असती. कारण त्यांनी 50 वर्षांपासून सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे.