गुजरातमध्ये भाविकांची बस उलटून २० ठार, ३० जखमी


वेब टीम : अहमदाबाद
गुजरातमध्ये भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बनासकांठामधील त्रिशुलिया घाट, अंबाजी जवळ भाविकांची बस उलटली.

यात बसमधील २० प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाल्याचे समजते.बसमधील सर्व प्रवाशी हे आणंदचे रहिवाशी आहेत.

हा अपघात अंबाजी मंदिराला भेट दिल्यानंतर दर्शन करून परतताना बसला झाला.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती समजलेले नाही.

चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा किंवा गाडी चालकाला डुलकी लागली असल्याने बस उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

बस उलटल्याची माहिती समजताच पोलीस, व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post