ऑस्करसाठी भारताकडून 'गली बॉय'ची निवड


वेब टीम : दिल्ली
रणवीर सिंग व आलिया भट्ट यांचा गाजलेला गली बॉय हा चित्रपट भारताकडून ऑस्करच्या शर्यतीत पाठविण्यात आला आहे.

अभिनेता फरहान अख्तरने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. 92 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 9 फेब्रुवारी 2020 ला होणार आहे.

मुंबईच्या रॅपर्सच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला दक्षिण कोरिया, मेलबर्न, बुयचोन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

य़ा चित्रपटात रणवीर सिंग, आलिया भट, काल्की कोएचिन, सिद्धार्थ चतुर्वेदी मुख्य भूमिकेत होते. झोया अख्तरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

या चित्रपटाने जगभरात तब्बल 238 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटातील गाणी जबरदस्त हिट झाली आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post