फटाक्याच्या कारखान्यात स्फोट : १९ मृत्युमुखी


वेब टीम : गुरुदासपूर
पंजाबच्या गुरूदासपूर जिल्ह्यातील बाटला येथील एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झाला.

 बरेच जण जखमी झाले असून दोन इमारतीत ५० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की,आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

हा स्फोट आज दुपारी चारच्या सुमारास झाला. या स्फोटातील जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये नेले आहे. या स्फोटात १९ जणांचा मृत्यूमुखी झाले असून बरेच जण जखमी आहेत. दोन इमारतीत ५० जण अडकल्याचे समजते.

 या सर्वांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी बचाव पथक प्रयत्नशील आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्फोटानंतर येथे मोठ्या प्रमाणात धूर पसरला.

या धुरामुळे लोकांना बाहेर काढताना अडचणी येत आहे,असे बचाव पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, या कारखान्याला परवानगी होती की तो अनधिकृत होता याची अद्याप माहिती समोर आलेली नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post