हिज्बुलच्या म्होरक्याला चकमकीत कंठस्नान


वेब टीम : जम्मू
भारतीय सैन्यदलाने हिज्बुल मुजाहिदीनच्या प्रमुख कमांडर ओसामाला कंठस्नान घातले आहे.

रामबन येथे झालेल्या चकमकीत ठार झालेला ओसामा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणात वाँटेड होता.

 ओसामा सोबतच त्याचे सहकारी जाहिद आणि फारुख हे सुद्धा चकमकीत ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शनिवारी सुमारे नऊ तास चकमक सुरू होती. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर सैन्याचा एक जवान शहीद झाला.

भाजपचे वरिष्ठ नेते अनिल परिहार आणि त्यांचे बंधू अजित परिहार तसेच आरएसएस पदाधिकारी चंद्रकांत शर्मा आणि त्यांच्या सेक्रेटरीची हत्या करण्यात ओसामाचा हात होता. त्याच्यावर मोठे इनाम देखील होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post