लक्षात ठेवा; पारनेरचा आमदार मीच ठरविणार : सुजय विखे


वेब टीम :  अहमदनगर
खासदार सुजय विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी पारनेर मध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी आमदार औटीं यांचे नाव न घेता कानपिचक्या दिल्या.

पारनेर मतदार संघातून सर्वात कमी मताधिक्य मिळाले. पण सुजय विखे होते म्हणून तरी हे मिळाले दुसरे कोणी असते तर २५ हजारांनी मागे राहीले असते. माझी वेळ आता निघून गेली आहे. ज्यांच्या निवडणूका येवू घातल्या आहेत त्यांनी लक्षात ठेवावे.

आमच्या कार्यकर्त्यांना योग्य सन्मानाची वागणूक दिली गेली पाहीजे. सन्मानाने सर्वांशी बोलले पाहीजे. कारण पारनेर चा आमदार कोण होणार हे मी आणि येथे बसलेले ठरवणार असल्याचे स्पष्ट केले.

नगर तालूक्यातील भोयरे पठार येथे वन विभागाच्या वतीने गॅस वाटपासाठी आमदार आणि खासदार दोघांनाही आमंत्रित करण्यात आले होते. दिड तास वाट पाहूनही खासदार येत नसल्याचे पाहून आमदारांनी गॅस योजनेच्या वाटपाचा कार्यक्रम उरकून घेतला. त्यानंतर उशीरा आलेल्या खासदार सुजय विखे यांनीही त्याच लाभार्थींना तेथेच पुन्हा गॅस वितरण कार्यक्रम करावा लागला.

पण आपल्या आधीच आमदारांनी कार्यक्रम उरकून घेतल्याने यापुढे एका कार्यक्रमासाठी एकालाच बोलवत जा असा खोचक टोला त्यांनी संयोजकांना लगावला.

नगर तालूक्यातील भोयरे पठार येथे वनविभागाच्या वतीने २९९ उज्वला गॅसचे वितरण कार्यक्रम सोमवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी वनविभागाने विदयमान आमदार आणि खासदारांना निमंत्रित केले होते.

वेळेचे भोक्ते असणारे आमदार औटी बरोबर पाच वाजता भोयरे पठार मध्ये दाखल झाले . सुमारे दिड तास वाट पाहूनही खासदार येत नसल्याचे पाहून आमदार औटी यांनी गॅस वितरणाचा कार्यक्रम उरकून घेतला आणि निधून गेले. त्यानंतर काही वेळाने खासदार विखे ही भोयरे पठार मध्ये दाखल झाले. आणि पुन्हा त्याच लाभार्थींना खासदारांच्या हस्ते गॅस चे वितरण करण्यात आले.

भाषणाच्या दरम्यान यापुढे संयोजकांनी कोणत्याही कार्यक्रमाला एकाच पाहूण्याला बोलवत जा म्हणजे कोणाला राग येण्याचे कारण होणार नाही असा खोचक सल्ला दिला. आमदार आणि खासदार यांचे टायमिंग न जूळल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र त्रेधातिरपीट करावी लागली.

यावेळी सरपंच बाबासाहेब टकले, राजेश बोरकर, राजू आंबेकर, संजय मुठे, कविता शिंदे, अरूण पंडित, अमोल टकले, संतोष आंबेकर, भास्कर टकले, दत्ता साठे, अनिल बोरकर आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post