जम्मू-काश्मीर: १२ तासांत तीन हल्ले, ४ अतिरेकी ठार


वेब टीम : जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये ऐन नवरात्रोत्सवाच्या आधी अतिरेकी हल्ल्यांचा प्रयत्न झाला आहे.

बारा तासांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन हल्ले झाले आहेत. दहशतवाद्यांनी रामबन येथे शनिवारी एका कुटुंबाला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला.

या कुटुंबाची सैन्याने सुटका केलीच, शिवाय घरात घुसलेल्या पाचपैकी चार अतिरेक्यांचा खात्माही केला.

श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या जवानांवर ग्रेनेड हल्लाही झाला. या व्यतिरिक्त गंदरबल जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला.

रामबनमध्ये पाच अतिरेक्यांना एका घरात घेरण्यात आल्याची माहिती मिळाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार एका भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबाला ओलीस ठेवले होते.

परिसरात सैन्य, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या पथकांनी या घराला घेराव घातला आणि या कुटुंबाची सुटका केली. पाच अतिरेकी या घरात घुसले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post