अभिनेत्री जुही चावलाची वेबसिरीज लवकरच येणार


वेब टीम : मुंबई
अभिनेत्री जुही चावला बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा अभिनय करताना दिसणार आहे.

यावेळी तिने वेब सिनेमाचे माध्यम निवडले आहे. ‘गुलाब गँग’नंतर ती पुन्हा एकदा खलनायिकेच्या रुपात पाहायला मिळणार आहे.

जुही म्हणते, की ‘आतापर्यंत प्रेक्षकांनी मला कधीही पाहिले नसेल अशी भूमिका साकारायचे मी ठरवले आहे.

ही भूमिका स्वीकारताना मी खूप विचार केला. पण, या भूमिकेत मला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल हे नक्की.’

या वेब सिनेमाची कथा मी ज्या क्षणी ऐकली त्या क्षणी मी कथेच्या प्रेमात पडले असे ही जुहीने सांगितले.

या वेब सिनेमाचे नाव काय असणार, जुहीसोबत इतर कोणते कलाकार आपल्याला पाहायला मिळणार या गोष्टी मात्र अद्याप गुलदस्त्यात आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post