कुलभूषण जाधवांबरोबर भारतीय उपउच्चायुक्तांची अडीच तास चर्चा


वेब टीम : इस्लामाबाद
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अखेर कायदेशीर मदत देऊ केली. त्यानुसार, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका तुरुंगात भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी जाधव यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अडीच तास चर्चा झाली.

या भेटीपूर्वी भारताने म्हटले होते की,आम्हाला आशा आहे की पाकिस्तान अशा प्रकारची योग्य वातावरण निर्मिती करेल की, ही बैठक स्वतंत्र, निष्पक्ष, यशस्वी आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (आयसीजे) आदेशांनुसार असेल.

 त्यावर रविवारी पाकिस्तानने घोषणा केली होती की, त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानुसार कुलभूषण जाधव यांना सोमवारी कायदेशीर मदत पुरवण्यात येईल.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण असल्याने सुमारे सहा आठवड्यांनंतर पाकिस्तानने रविवारी या भेटीबाबत घोषणा केली.

पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी रविवारी ट्विटद्वारे म्हटले होते की, जाधव यांना व्हिएन्ना करारानुसार आणि आयसीजेच्या आदेशांनुसार कायदेशीर मदत पोहोचवली जाईल.

मात्र, त्यांनी या ट्विटमध्ये हे स्पष्ट केले नव्हते की या भेटीदरम्यान तिथे पाकिस्तानी अधिकारी उपस्थित असेल किंवा नाही?

पाकिस्तानने जाधव यांना कायदेशीर मदत देण्यास कायमच नकार दिला होता. भारताने प्रत्येक वेळी व्हिएन्ना कराराचा दाखला देत आपल्या नागरिकाशी भेटीचे अपिल केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post