नगरमध्ये रंगला महिला कुस्त्यांचा थरार


वेब टीम : अहमदनगर
ह्रदयाचा ठोका चुकवित विविध डावपेचांनी महिला कुस्तीपटूंनी निमगाव वाघाचे मैदान गाजविले. महिलांच्या कुस्तीने नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेचा समारोप झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नगर तालुका क्रीडा समिती आयोजित तर नवनाथ विद्यालयाच्या सहकार्याने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी नगर तालुक्यातील 136 महिला कुस्तीपटूंचा उत्सफुर्त सहभाग लाभला.
महिला कुस्तीपटूंच्या सामन्याचे प्रारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनिषा पुंडे यांच्या हस्ते कुस्ती लाऊन झाले.

 यावेळी प्र.मुख्याध्यापक किसन वाबळे, क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे, चंद्रकांत पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अंजली देवकर, शिवाजी धामणे, दिपक ठाणगे, बाळासाहेब शिंदे, मिलींद थोरे, भगवान मते, दत्ता कापसे, भानुदास ठोकळ, रामचंद्र कोकाटे, सिताराम बोरुडे, पै.संदिप डोंगरे, रुक्मिणी मोरे, स्वाती उमाप, प्रितम दाभाडे आदींसह खेळाडू, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर तालुका शालेय कुस्ती स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी शालेय मुलींचा कुस्तीचा थरार रंगला होता. कुस्ती म्हणजे मुलांचा खेळ याला छेद देत मुलींनी एकापेक्षा एक सरस डावपेचांनी आपल्या उत्कृष्ट कुस्त्यांचा खेळ सादर केला.

उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलींना दाद दिली. स्पर्धेचे पंच म्हणून राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे, समीर पटेल, मल्हारी कांडेकर यांनी काम पाहिले.

झालेल्या मुला-मुलींच्या शालेय कुस्ती स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची दि.20 ते 22 सप्टेंबर दरम्यान नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती विद्यालयात होणार्‍या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post