लष्कर उपप्रमुखपदी पुण्याचे मनोज नरवणे


वेब टीम : पुणे
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची आज भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.

लेफ्टनंट जनरल डी अंबू यांच्या जागी त्यांनी लष्कर उपप्रमुखपदाचा कार्यभार स्विकारला. विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्याने नरवणे लष्करप्रमुखपदाच्या शर्यतीत असण्याची शक्यता आहे.

मूळचे पुण्याचे असलेल्या नरवणेंचे शालेय शिक्षण पुण्याच्या ‘ज्ञानप्रबोधिनी’त झाले आहे. चित्रकलेची आवड जोपासतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post